Monday, November 23, 2026
Homeमुख्य बातम्याहोळ येथे सायकल मार्टला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

होळ येथे सायकल मार्टला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

Spread the love

केज / प्रतिनिधी :

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील होळ येथे सायकल मार्ट दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. ही घटना गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.

होळ येथील रघुनाथ मानिक घुगे यांच्या मालकीच्या सायकल मार्ट दुकानाला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. दुकानाला आग लागल्याचे समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग इतकी भीषण होती की गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू असतानाच संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, दुकानाला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नुकसानग्रस्त दुकानदाराला आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

सध्या तालुक्यात अशा प्रकारच्या आगीच्या घटना सातत्याने घडत असल्याने व्यापारी आणि व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कष्टाने उभा केलेला व्यवसाय क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments