धक्का बसलाच! लाडकी बहीण योजनेत ७१ लाख महिला अपात्र

digital beed २१,३०० कोटींचा निधी वादात; एप्रिलपासून अपात्र लाभार्थ्यांचे मानधन बंद महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत तब्बल ७१ लाख महिला अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.महिला व बालविकास विभागाने अलीकडेच हाती घेतलेल्या ई-केवायसी (e-KYC) … Read more

धडक इतकी भीषण की कार जळून खाक; मायलेकाचा जागीच अंत

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात शुक्रवारी (दि. २७) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. कापसी फाटा परिसरात हायवा डंपर आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच संपूर्ण वाहन ज्वाळांनी वेढले गेले. या दुर्घटनेत कारमधील मायलेकाचा जागीच जळून मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली … Read more

बीडमध्ये नवीन रेल्वे मार्गासाठी हालचाली वेगवान; जमीन संपादन प्रक्रिया सुरू

बीड | प्रतिनिधीमराठवाड्याच्या विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या कामाला आता वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. केंद्र सरकारच्या विकास धोरणाचा भाग असलेल्या या रेल्वे प्रकल्पाबाबत प्रशासनाने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.२७ मार्च २०२६ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी … Read more

अंबाजोगाई नर्सिंग महाविद्यालयासाठी ‘जायका’ प्रकल्पातून मोठा निधी मंजूर; आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला यश

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन आणि ‘जायका’ (JICA) प्रकल्पांतर्गत मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत अधिकृत घोषणा केल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा निधी मिळाल्याचे स्पष्ट झाले … Read more

मोठा निर्णय! महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! – आदिती तटकरे महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा सन्मान निधी देण्यात येत असून, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती महिला … Read more

फक्त मुलाखतीतून निवड; परीक्षा नाही! मोठी अपडेट

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ भरती 2026 – विविध पदांसाठी सुवर्णसंधीमुंबईतील नामांकित शैक्षणिक संस्था श्री विलेपार्ले केळवणी मंडळ यांनी 2026 साठी विविध पदांवर भरती जाहीर केली आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. विशेषतः मानसशास्त्र, विशेष शिक्षण, ग्रंथालय सेवा आणि वसतिगृह व्यवस्थापन या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी ही … Read more

वेताळवाडी येथे ह.भ.प. काशीनाथ महाराज यांचा १४वा नारळी सप्ताह २६ मार्चपासून; भागवत कथा व कीर्तनांचा भव्य सोहळा

वेताळवाडी (प्रतिनिधी): वारकरी संप्रदायातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची व भक्तीमय बातमी समोर येत आहे. ह.भ.प. श्री मंहत गुरूवर्य काशीनाथ महाराज यांच्या प्रेरणेतून १४वा नारळी सप्ताह मौजे वेताळवाडी येथे गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्ती, नामस्मरण आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे. या सप्ताहात दररोज विविध … Read more

केज नगरपंचायतीत १० वर्षांत ५० कोटींचा महाघोटाळा? शेकाप आक्रमक; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

केज | प्रतिनिधी (DigitalBeed.in) केज नगरपंचायतीच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०१५ ते २०२६ या कालावधीत नगरपंचायतीमध्ये तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिकचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई … Read more

पुढील ३ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; बीडसह अनेक जिल्ह्यांत सतर्कतेचे आवाहन

महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होत असून पुढील तीन तास राज्यातील काही भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही … Read more

अंबाजोगाईच्या लेकीचे सह्याद्रीत धाडस; किर्ती पुरीने १८०० फुटी कोकणकडा रॅपलिंगने सर केला

महाराष्ट्रातील साहसप्रेमींना प्रेरणा देणारी एक अभिमानास्पद घटना समोर आली आहे. अंबाजोगाई येथील कन्या आणि सध्या पुणे येथे स्थायिक असलेल्या कृषी अभियंता किर्ती दिनेश पुरी यांनी सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या हरिश्चंद्रगड वरील प्रसिद्ध कोकणकडा येथे १८०० फूट उंचीवरून रॅपलिंग करत एक अनोखा विक्रम केला आहे. एका तासात थरारक पराक्रमकोकणकडा हा सह्याद्रीतील अत्यंत अवघड आणि धोकादायक कड्यांपैकी एक … Read more